उस्मानाबाद! तलाठी व कोतवाल २५ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात सापडला


उस्मानाबाद/प्रतिनिधी:

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील अचलेर येथील तलाठी शेतीचा फेर फार वरिष्ठांकडून मंजूर करण्यासाठी २५ हजाराची लाच स्वीकारताना कोतवालासह लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकल्याची घटना जेवळी ता. लोहारा येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अचलेर ता. लोहारा येथील तक्रारदार यांच्या वडीलांनी २००५ मध्ये शेत जमीन घेतली आहे. त्या शेत जमीनीचा फेर फार करण्यासाठी अचलेर सज्जाचे तलाठी पवार यांच्याकडे काही दिवसापासून हेलपाटे मारत होते. तलाठी पवार यांनी तक्रारदार यांना वरिष्ठांकडून फेर फार करून देऊन ऑनलाइन नमुना नंबर नऊची नोटीस काढण्यासाठी ४० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती ३५ हजार रूपये देण्याचे ठरले. 

त्यानुसार तक्रारदाराने उस्मानाबाद येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. या कामासाठी तक्रारदाराकडून अगोदर नगदी दहा हजार रूपये घेतले गेले आहे. उस्मानाबाद लाच लुचपत विभागाने सापळा रचून लोहारा तालुक्यातील जेवळी येथे सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास एका पान टपरीवर २५ हजार रूपयांची रोख रक्कम स्वीकारताना तलाठी युवराज पवार, कोतवाल प्रभाकर रुपनर या दोघांना रंगेहात पकडले. लाच लुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक हुलगे, पोलिस अधिकारी इफ्तेकर शेख, शिध्देश्वर तावसकर, विष्णू बेळे, अविनाश आचार्य, सचिन शेवाळे चालक दत्तात्रय करडे यांच्या पथकाने कारवाई केली. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments