सांगोला/प्रतिनिधी:
चाईल्ड पोनोग्राफीचा धक्कादायक प्रकार सांगोला शहरात उघडकीस आला आहे. चाईल्ड पॉर्नचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सायबर सेलने सांगोला शहरातील एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चाइल्ड पोनोग्राफी रोखण्यासाठी केंद्र सरकारने कडक कायदे केल्यानंतर, त्याबाबत धडक कारवाया सुरु आहेत. चाईल्ड पॉर्न व्हिडीओ किंवा त्यासंबंधित कोणता व्हिडीओ फोटो तुम्ही कुणाला पाठवला तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागू शकते. चाईल्ड पॉर्न बनवणं, पाहणं, फॉरवर्ड करणं आणि त्याला प्रोत्साहन देणं भारतात कायद्याने गुन्हा आहे. असं असताना देखील वारंवार अशाप्रकारच्या घटना घडत आहेत.
महाराष्ट्र सायबर कार्यालयाचे विशेष पोलीस महानिरिक्षक यांच्या कार्यालयाकडून सोलापूर शहर आयुक्त यांना पत्र प्राप्त झाले होते. त्यांच्याकडून सदरचे पत्र पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकडे पाठविण्यात आले. त्यानंतर सदरचे पत्र मिळताच सोलापूर ग्रामीण सायबर पोलीस ठाणे यांच्याकडे प्राप्त झाले. सायबर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या आदेशावरुन सदर टिपलाईन सोबत प्राप्त कागदपत्रे व सीडी यांचे अवलोकन करण्यास सांगितले होते.
दरम्यान सायबर पोलीस ठाण्याचे पोसई सुरज निंबाळकर यांचे समक्ष सीडी ओपन केली असता फोल्डरमध्ये एक पीडीएफ दिली आहे. फाईल ओपन झाली. सदर पीडीएफमध्ये एक अश्लील पोर्न व्हिडीओ फाईल दिसून आली. त्या पीडीएफ फाईलमध्ये एक चाईल्ड पोर्न व्हिडिओ मिळून आला. सदर आयपी पत्याचे आयपीडीआर व मोबाईल नंबरचे सीडीआर कंपनीकडून पडताळणी केली असता सदर मोबाईल नंबर शोध घेवून तो मोबाईल नंबर सांगोला शहरातील एका तरुणाचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. संबंधित तरुणाने त्याच्या व्हट्सअप अकाउंटवरुन चाईल्ड पोनों ग्राफी मेसेजद्वारे प्रसारीत केल्याचे दिसून आले. याबाबत सायबर पोलीस ठाण्याचे पोकों अन्वर अत्तार यांनी संबंधित तरुणाच्या विरुद्ध माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ (बी) प्रमाणे सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
0 Comments