“भोंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्वाचासुध्दा गळा घोटला”


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्यावरील आक्रमक भूमिकेमुळे सध्या राज्यात गदारोळ पहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी 4 मे चा अल्टिमेटम दिला होता त्यानुसार आजपासून मनसैनिक आंदोलन करताना दिसत आहे.

अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचासुध्दा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक तीर्थस्थानावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही, असं ट्विट करत संजय राऊत यांनी मनसेवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

मंदिरातील काकड आरती वर्षांनुवर्षे भोंग्याद्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते. असे म्हणत राऊत यांनी याचे खापर राज ठाकरे यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भोंग्यावरुन घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे यामध्ये खंड पडला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. दरम्यान, भोंग्यावरुन राज्यातील वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments