प्रेयसीचे अश्लील छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित, प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल



प्रेयसीला सीताबर्डीतील हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना मोबाईलने अश्लील छायाचित्र काढून समाज माध्यमांवर प्रकाशित केले. या प्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. वरूण मुकेश चौधरी (रा. कामठी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरूणी ही मध्यप्रदेशातील शिवणी शहरातील रहिवाशी आहे. तिची आणि आरोपी वरण चौधरी याची भेट मार्च २०२१ रोजी कामठी येथील एका लग्नसमारंभात झाली होती. तेव्हापासून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. यानंतर दोघांच्याही भेटी वाढल्या. आरोपी वरूणने तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला भेटायला नागपुरात बोलावले. आरोपी वरूणने २५ मे रोजी पीडितेला सीताबर्डीत बोलावले. तिला घेऊन एका हॉटेलमध्ये गेला. तेथे तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे वरूणने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे तरूणीने त्याला होकार दिला. त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करताना मोबाईलने तरूणीचे अश्लील छायाचित्र काढले. त्यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला.

Post a Comment

0 Comments