बार्शी तालुक्यातील मुंगशी शिवारामध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकावर वैराग पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडून ४ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई २३ मे रोजी साडेअकराच्या दरम्यान केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे मुंगशी वा ता बार्शी या गावचे शिवारातील जयसिंग हरिदास क्षिरसागर यांचे घराजवळ मुंगशी ते कळमण रोडवर मौजे मुंगशी वा ता बार्शी येथे दिग्वीजय दत्तात्रय क्षिरसागर रा. मुंगशी वा ता. बार्शी जि. सोलापुर यांनी शासनाचा कसल्याही प्रकारचा पास परवाना न घेता अगर रयल्टी न भरता, पर्यावरणाचा -हास होत आहे हे माहीत असुन सुध्दा वाळू उपसा करून ट्रॅक्टर मध्ये भरुन स्वतःचे फायदेसाठी चोरून वाळु घेवून जात असताना मिळून आले आहेत म्हणुन माझी त्यांचे विरूध्द सरकारतर्फे भा. द. वि. कलम ३७९ पर्यावरण संरक्षण अधिनियम ९ व १५ प्रमाणे फिर्याद आहे.
0 Comments