सोलापूर/प्रतिनिधी:
लहान मुलाचे किरकोळ भांडणावरून शास्त्रीनगर येथील मदिना हॉटेल या ठिकाणी दगडफेक केल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात हकीकत अशी की;गुरुवारी रात्रीच्या सुमारा लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून तक्रार झाल्याने एकमेकांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली.या दगडफेकीत आरोपीत नामे अरबाज शब्बीर हे जखमी झाले आहे.दगडफेकीची माहिती मिळताच घटनास्थळी सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे दाखल झाले होते.
पोलीस शिपाई नितीन रमेश काळे नेमणूक सदर बझार पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोसीन सलीम नदाफ,उमर नदाफ, मेहराज नदाफ,इम्तियाज जमादार, मोसीन नदाफ, शाहरूख नदाफ सर्व रा शास्त्रीनगर सोलापूर,शहानवाज मोहोळकर,रिजवान हावलदार,अजगर कुरेशी,अलीम कुरेशी,अरबाज शब्बीर रा शास्त्रीनगर, सोलापूर यांच्या विरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सहायक फौजदार काळे हे करत आहे.
0 Comments