बार्शी प्रतिनिधी
बार्शी तालुक्यातील सारोळा गावातील ४२ वर्षीय इसम कुबेर विठ्ठल कानगुडे हे अपघातांमध्ये गंभीर जखमी झाले होते. तुळजापूर तालुक्यातील कात्रे गावाजवळ त्यांचा अपघात झाला होता, हा अपघात १० मे रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान झाला होता. त्यावेळी त्यांना तुळजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे १३ मे रोजी बैलाचा मेहुणा हनुमंत मनोहर निंबाळकर यांनी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.
उपचारादरम्यान त्यांचा १७ मे रोजी मृत्यू झाला आहे, अशी खबर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल चे डॉ. रिशिल अग्रवाल यांनी दिली आहे या घटनेची नोंद सिव्हील हॉस्पिटल पोलीस चौकी सोलापूर येथे करण्यात आली आहे.
0 Comments