सोलापूर/प्रतिनिधी:
सोलापूर शहरातील सदर बझार पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार महमद हनिफ ऊर्फ मुन्ना ऊर्फ वॉन्टेड अब्दुल सत्तार शेख, वय ५४ वर्षे रा. केशव स्मृती झोपडपट्टी, रेल्वे लाईन, सोलापूर सध्या रा. नई जिंदगी, ज्योती किराणा दुकानाच्या पाठीमागे, सोलापूर यास एमपीडीए अधिनियम १९८१ अन्वये दि.१८/०५/२०२२ रोजी स्थानबध्द केले आहे.
महमद हनिफ ऊर्फ मुन्ना ऊर्फ वॉन्टेड अब्दुल सत्तार शेख हा मागील अनेक वर्षापासून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी दहशत व भिती घालून नागरीकांविरुध्द गुन्हेगारी वर्तन केले आहे. तो स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी व्यापारी व सामान्य नागरीक यांना दहशत व भिती घालून केशवस्मृति झोपडपट्टी, रेल्वे लाईन, फॉरेस्ट, चांदणी चौक, स्टेशन भाजी मंडई, मोदी, सातरस्ता, जुना एम्प्लॉयमेन्ट चौक, वाडीया हॉस्पीटल जवळ या परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे.
या परिसरात घातक शस्त्रानिशी फिरून जिवघेण्या घातक शस्त्रानिशी फिरुन हल्ला करणे, खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, दगडफेक करणे, बेकायदेशिर दुकान/घरजागा बळकाविणे, घराविषयी आगळीक करणे, सरकारी नौकरावर हल्ला करणे यासारखे गंभीर गुन्हे करत असतो. अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करून महमद हनिफ ऊर्फ मुन्ना ऊर्फ वॉन्टेड अब्दुल सत्तार शेख याने परिसरात दहशत व भिती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे. अशा प्रकारे त्याने परिसरात दहशत निर्माण करून स्वतःस धोकादायक इसम म्हणून सिध्द केले आहे.
महमद हनिफ ऊर्फ मुन्ना ऊर्फ वॉन्टेड अब्दुल सत्तार शेख याचे विरुध्द शहरातील सदर बझार पोलीस ठाण्यास १० गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याच्या नोंदी आहेत. त्यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २००८ मध्ये क. ११० (ई) (ग) फौ.प्र.सं अधिनियमानुसार सन २०१७ मध्ये क.०३ एमपीडीए कायदयान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. महमद हनिफ ऊर्फ मुन्ना ऊर्फ वॉन्टेड अब्दुल सत्तार शेख याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही, पुन्हा त्याने सन २०२२ मध्ये अलीकडील काळात घातक शस्त्राद्वारे गंभीर दुखापत पोचुन खंडणी मागण्यासारखा गंभीर दुखापत पोचुन गंभीर स्वरुपाचा स्वरुपाचा गुन्हा केला आहे.
महमद हनिफ ऊर्फ मुन्ना ऊर्फ वॉन्टेड अब्दुल सत्तार शेख याचे विषद वेळोवेळी कार्यवाही करुनही त्याच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही. त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी मा.पोलीस आयुक्त यांनी त्यास एमपीडीए अधिनियम १९८१ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यास आदेशाची बजावणी करुन येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे. मा. पोलीस आयुक्त श्री हरीश बैजल सोलापूर शहर यांनी कार्यभार स्विकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची सहावी व या वर्षातील चौथी कार्यवाही आहे.
पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचे आदेशाप्रमाणे बापू बांगर पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशा) यांचे नियोजन व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे डॉ. प्रिती टिपरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे संजय साळुंखे, पोउपनि विशेंद्रसिंग बायस व विशेषतः एमपीडीए पथकातील अंमलदार पोना विनायक संगमवार, पोना सुदीप शिंदे,पोशि अक्षय जाधव, पोशि पांडुरंग धानुरे,पोशि विशाल नवले,मपोनि श्रीमती अश्विनी भोसले सदरची कामगिरी पार पाडली.
0 Comments