वैराग! मयतास कारणीभूत ठरल्याबद्दल एकावर वैराग गुन्हा दाखल



सिकंदर उस्मान शेख वय. २६ रा. संजयनगर वैराग, ता.बार्शी  यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २६ एप्रिल रोजी रात्री ८.०० वा सुमारास अमोल बबन खांडेकर रा. शारदादेवीनगर वैराग, ता. बार्शी याने त्याचे ताब्यातील मोटार सायकल नं. एमएच 13/ डी.डब्ल्यु- ०५३३ हि अविचारान, हायगईने,रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात चालवुन त्याचे मोटार सायकलवर पाठिमागे बसलेली माझी आई- मुमताज उस्मान शेख वय. ५० रा. संजयनगर वैराग, ता. बार्शी हि मोटार सायकलवरुन खाली पडुन गंभिर जखमी होण्यास व ति उपचारा दरम्यान २८एप्रिल रोजी मयत होण्यास कारणीभुत झाला आहे म्हणुन माझी अमोल बबन खांडेकर याचे विरुध्द तक्रार आहे. त्याच्या तक्रारीनुसार भादवि कलम २७९, ३०४अ,३३८ मोटार अधिनियम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती १३ मे रोजी वैराग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments