वैराग:
पतीला नोकरी साठी पैसे भरण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये म्हणत जाचहट करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शिक्षक पतीसह सासू-सासऱ्या वर वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची फिर्याद आशा नानासाहेब कदम (वय २६, रा. वाळूज, ता. मोहोळ, सध्या रा. शारदादेवी नगर वैराग, ता. बार्शी) या विवाहित महिलेने दिलेल्या फिर्याद शिक्षक पती नानासाहेब बळीराम कदम, सासू कावेरावाई बळीराम कदम, सासरे बळीराम निवती कदम (सर्व रा. वाळूज) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासरच्या लोकांनी फेबुवारी २०२१ ते १४ मे २०२२ पर्यत फिर्यादीच्या पतीची माढा येथे शिक्षक नोकरीची कायम ऑर्डर काढण्यासाठी दोन लाख रुपये माहेरातून आणण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ केला असल्याचे पोलिसात फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा अधिक तपास वैराग पोलिस करत आहेत.
0 Comments