परंडा/ प्रतिनिधी:
अध्यात्मिक गुरु प.पू. श्रीश्री रविशंकर गुरुदेव यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने संपूर्ण महाराष्ट्र भर श्रीश्री सेवा महोत्सव २०२२ राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत प.पु.रामानंद सरस्वती महाराज सार्वजनिक वाचनालय कपिलापुरी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद येथे 50 पुस्तकांचा संच वाचनालयाच्या मार्गदर्शिका सौ.संगीता पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
गावातील मुले,युवक,पुरुषांबरोबर महिलांनी घरकाम झाल्यानंतर थोडा वेळ पुस्तक,ग्रंथ,वाचनात घालवावा यासाठी महिलांनी पुढे यावे व वाचनालयातील पुस्तकांचा लाभ घ्यावा असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष रणजीत पाटील यांनी सांगितले.
या प्रसंगी तुळजाभवानी महिला बचत गट व सरस्वती महिला बचत गटा कपिलापुरीच्या कल्पना पाटील,मनीषा पाटील,स्वप्नाली पाटील,मृणाली जैन,ज्योती लटके,आरोही पाटील आदीसह अनेक महिला उपस्थित होत्या.तसेच श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा प.पु.रामानंद सरस्वती महाराज सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रणजीत महादेव पाटील,स्वराज लटके,शिवराज लटके उपस्थित होते...!
0 Comments