दयानंद पिंगळे यांच्या तक्रारीवर घेतली दखल..! ग्रामसेवक बाविस्कर यांचेवर दंडात्मक कारवाई


   
बार्शी/प्रतिनिधी: 
                   
 बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथील ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.तात्कालीन ग्रामसेवक पी बी. बाविस्कर यांना ग्रामपंचायत संदर्भात वेळोवेळी केलेल्या कामाची माहिती व इतर माहिती माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये विचारणा केली होती.ती माहिती दिली नसल्या कारणाने मा.प्रथम अपिलीय अधिकारी यांचेकडे प्रथम अपील केले होते त्यात सुनावणी दरम्यान ग्रामसेवक हे जाणून बुजून वेळोवेळी उपस्थित राहत नव्हते.अपिलीय अधिकारी ( विस्तार अधिकारी) यांनी देखील माहिती देण्याचे वारंवार आदेश दिलेले आहेत.परंतु त्यांनी माहिती न दिल्याने ग्रामपंचायत मध्ये अपहार झाल्याचे लक्षात आले.

त्यामुळे वारंवार संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नसल्याने त्यांचे विरूद्ध कारवाई / कार्यवाही करण्याबाबत वारंवार गटविकास अधिकारी श्री शेखर सावंत यांना भेटून तक्रारी केल्या आहेत परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून   मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी,विभागीय आयुक्त पुणे यांचेकडे तक्रारी केल्या होत्या, त्यावर विभागीय आयुक्त पुणे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनांक :3101/2022 रोजी पत्राद्वारे कार्यवाही करण्या करिता कळविले होते,तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी श्री शेखर सावंत यांना दिनांक 10/02/2022 रोजी चे पत्राद्वारे कार्यवाही करण्यास सांगितली  व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 1602/2022 रोजी ग्रामसेवक बाविस्कर यांना 7 दिवसांच्या आत गटविकास अधिकारी यांचेसमोर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, परंतु त्यांनी अहवाल सदर केला नाही व त्या संदर्भात गटविकास अधिकारी यांना दिनांक 24/02/2022, 23/03/2022 , 16/03/2022 रोजी वारंवार पत्राद्वारे कळविले होते, परंतु त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.म्हणून सहाय्यक संचालक , स्तानिक निधी लेखा परीक्षा विभाग सोलापूर यांचेकडे तक्रार केली होती, त्यावर त्यांनी तकरिवर दखल घेत ग्रामपंचायत मध्ये समक्ष पाहणी करून चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही ग्रामसेवक यांनी प्रतिसाद दिला नाही,त्यांनी चौकशी केल्यावर त्यात ग्रामपंचायत चे कोणत्याही प्रकारचे दप्तर पूर्ण नसल्याचे दिसून आले.


संदर्भात चौकशी केल्या नंतर त्यांनी विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी,गटविकास अधिकारी यांना पत्रव्यवहार केला व ग्रामसेवक बाविस्कर यांचेवर 25000 रुपये शास्ती व कारवाही करण्याची प्रस्तावित केले आहे. ही सर्व हकीकत पाहता गटविकास अधिकारी यांनी देखील शासन परिपत्रक 4 जानेवारी 2017 चे परिपत्रक चे व माहिती अधिकार अधिनियम/ग्रामपंचायत अधिनियम व इतर कायद्यांचे उल्लंघन केलेले आहे व ग्रामसेवक बाविस्कर यांचेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्य था  वरील विषयात आम्ही योग्य त्या न्यायव्यवस्था कडे दाद मागणार आहोत  असे दयानंद पिंगळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments