सदावर्तेंकडून ‘एसटी कष्टकरी जनसंघ संघटने’ची स्थापना!



राज्यभरात झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ते एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत स्वत:चं पॅनेल उभा करून राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देणार असल्याचे त्यांनी स्वत: सांगितले आहे. सदावर्ते यांनी आज ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ या आपल्या संघटनेची स्थापना केली असून त्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

कोर्टाच्या आवारात दिसणारे गुणरत्न सदावर्ते आता राजकीय आखाड्यात दिसणार आहेत. एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत स्वत:चे ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ हे पॅनल उभा करणार आहेत.

राज्य सरकारवर घणाघाती आरोप करत गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, यापुढे आता कष्टकीर माणसाचे नेतृत्व शेतातील बुजगावण्यांच्या हाती नसेल. कष्टकरी समाज आता स्वत:चीच माणसे निवडतील. आजवर या बुजगावण्यांनी कष्टकऱ्यांचे आर्थिक शोषण करण्याचे काम केले. आता ही परिस्थीती तशीच राहणार नाही. परिस्थिती नक्की बदलणार आहे. ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ या संगघटनेच्या माध्यमातून एसटी बँकेची निवडणूक लढवणार असून आम्ही प्रस्तापीतांना धक्का देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एसटी महामंडळाच्या बँकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित संघटनेची सत्ता आहे. या संघटनेच्या विरोधात ॲड. सदावर्तेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ या संघटनेच्या माध्यमातून एसटी बँकेच्या निवडणुकीत ते राष्ट्रवादी विरोधात रणशिंग फुंकणार आहेत.


Post a Comment

0 Comments