राधानगरी तालुका प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्थेच्या व्हा. चेअरमन पदी वाकीघोलच्या शिवाजीराव झाटे यांची फेर निवड



वाकिघोल सारख्या दुर्गम डोंगराळ भागातून अनेक विद्यार्थी घडवत आज कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण अश्या राधानगरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक बँकेच्या व्हा.चेअरमन पदी फेर निवड झाली ,आपल्या अलोकिक कार्य कौशल्याच्या जोरावर आणि प्रामाणिक कष्ट करण्याच्या तयारीवर तुम्हाला पुन्हा एकदा ही जबाबदारी मिळाली आहे. 

आजतागायत  अनेक कौटुंबिक सामाजिक, शैक्षणिक अडचणींना सामोरं जात , सावर्दे शाळेच्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी आपण अत्यंत चागल्या पद्धतीने पार पाडत आहात ,  आज कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण अश्या राधानगरी  तालुका प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्थेच्या व्हा. चेअरमन पदाची जबाबदारी पुन्हा एकदा तुम्ही घेत आहात याबद्दल आपले मनापासून अभिनंदन आजवर अनेक कौटुंबिक ,सामाजिक, शैक्षणिक जबाबदाऱ्या तुम्ही नेटाने पार पाडता आलेला आहात.

तशीच शिक्षक  तालुका  पत संस्थेने दिलेली ही जबाबदारी देखील तुमच्या संयमी ,प्रामाणिक, कार्यशैली च्या जोरावर तुम्ही यशस्वीरित्या पार पाडाल ,अशी अपेक्षा आहे येणाऱ्या काळात तुमच्याकडून प्राथमिक सहकारी शिक्षक  पत संस्थेची उंची वाढावी आपल्या हातून योग्य अचूक कामे व्हावीत यासाठी मनापासून सदिच्छा.

Post a Comment

0 Comments