सोलापुरातील पोलीस हवालदाराची मुंबईत कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या


मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या एका पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गौतम साबळे, असे या पोलीस हवलदाराचे नाव आहे.  याप्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.

गौतम साबळे हे कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्वेनगर येथील इमारत क्र. पी १ येथे वास्तव्याला होते. साबळे यांनी एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेचे कर्ज घेतले होते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे बँकांच्या कर्जाचे हफ्ते फेडू शकत नसल्याने ते नैराश्येत होते. याच विवंचनेतून शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती मिळताच कांजूरमार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Post a Comment

0 Comments