सोलापूर! नान्नजमध्ये ऑर्केस्ट्रा बारवर छापा; १८ जणांवर कारवाई


नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील सोलापूर - बार्शी रस्त्यावर असणाऱ्या विजयराज ऑर्केस्ट्रा बारवर मध्यरात्री उत्तर तालुका पोलिसांनी छापा टाकून २ बारबालांसह इतर २ १६ अशा १८ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.नान्नज येथील विजयराज ऑर्केस्ट्रा बार मध्यरात्री नियमबाह्य सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. बारमध्ये बारबाला तरुणी तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य करीत होत्या. 

गाण्याच्या तालावर थिरकणाऱ्या बारबालांवर तरुण पैशाच्या नोटांची मोठ्या प्रमाणात उधळण करीत असल्याचे दिसून आले. यावेळी उत्तर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी आर्केस्ट्रा बारमधील दोन बारबाला तरुणीसह १६ व्यक्ती असे एकूण १८ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल माधव लाकाडे यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments