तुळजापूर! किरकोळ कारणावरुन मामाने झाडली भाच्यावर गोळी



तुळजापूर/प्रतिनिधी:

बहिणीला घरचे त्रास देतात म्हणुन भाऊ बहिणीच्या घरच्याना विचारायला गेला याचे रुपांतर भांडणात झाले रागाच्या भरात मामाने भाच्यावर गावटी कट्टयातुन गोळी झाडली सुदैवाने भाचा जखमी झाला असुन मामा फरार आहे. हि घटणा तुळजापुर तालुक्यातील बारुळ येथे घडली आहे. या बाबत अधिक माहिती अशी कि आरोपी भाग्यवान लक्ष्मण गायकवाड रा चिकुंद्रा याची बहिण तुळजापुर तालुक्यातील बारुळ येथे दिली आहे सदरील आरोपीच्या बहिणीला घरचे नेहमी त्रास देतात म्हणुन भाग्यवान गायकवाड हा जाब विचारण्यासाठी गेला असता सुरुवातीला भांडण झाले याचे रुपांतर हाणामारीत झाले भाच्चा सार्थक मस्के वय १३ हा वडिलांची बाजु घेतोय म्हणुन रागाच्या भरात भाग्यवान गायकवाड याने भाच्चा सार्थकवर गोळी झाडली वेळीच सार्थकने डावा हात वर केल्यामुळे कोपऱ्याच्या खाली गोळी चाटुन गेली यात सार्थकच्या डाव्या कोपऱ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्या तत्काळ सोलापुर येथील अश्विनी हाँस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले.

गोळी भाच्चाला लागतातच भाग्यवान गायकवाड हा तेथुन पळुन गेला. या बाबत दिगंबर बळी मस्के यांनी तुळजापुर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असुन भाग्यवान लक्ष्मण गायकवाड विरोधात भादवी ३०७, ५०४ सह कलम ४. २५ आर्म अँक्ट नुसार गुन्हा दाखल केला असुन आरोपी भाग्यवान गायकवाड हा फरार आहे.

तुळजापुर तालुक्यात गावटी पिस्टलची मालीका 

बारुळ येथील घटणे मध्ये आरोपीने गावटी पिस्टल वापरले असुन गावटी पिस्टल आले कोठुन हा शोध पोलीसांना घ्यावा लागणार आहे. कारण गावटी पिस्टल बनवणारी टोळी तालुक्यात सक्रिय झाली आहे हे पाहणे गरजेचे आहे. कारण ३० डिसेंबर २०२१ रोजी २ तरुण लातुर रोड वरिल पाचुंदा येथे गावटी पिस्टल विक्रीसाठी आले आहेत अशी खबर पोलीसांना मिळाली होती पोलीसांनी पाचुंदा येथे जावुन संशयास्पद वाटणाऱ्या १)राजेंद्र सुरेंद्र कांबळे रा. खंडाळा २) ओंकार प्रदीप कांबळे रा. काक्रंबा यांची झडती घेतली असता २ गावटी पिस्टल सापडले होते अधिक चौकशी केली असता ७ जानेवारी पर्यंत २ गावटी पिस्टल सापडले होते ४ मुलांकडे ४ गावटी पिस्टल सापडल्यामुळे पोलीस सुध्दा अचंबित झाले होते. त्या नंतर हि दुसरी घटना आहे तालुक्यात शहरात गावटी पिस्टल येतात कोठुन हे शोधने गरजेचे आहे.

अधिक तपास पोलीस उप विभागीय अधिकारी डॉ सई भोरे पाटील पोलीस निरिक्षक अजिनाथ काशिद व सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत.

Post a Comment

0 Comments