सोलापुरातील राष्ट्रवादी विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना शोध आणि तोडा मोहीम चांगलीच महागात पडली, यांना राष्ट्रवादीकडून खुलासा



राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केतकी चितळे नामक महिलेने खालच्या स्तरावरील टीका केल्यानंतर सर्व स्तरातून याचा निषेध करण्यात आला मात्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सुहास कदम यांनी शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर टीका कन्नड विरोधात विद्यार्थी राष्ट्रवादीकडून शोधा आणि फोडा मोहीम सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले मात्र ही मोहीम सुहास कदम यांना चांगलीच महागात पडली याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी कडक भूमिका घेत आहे. विश्वास कदम यांना या मोहिमेने बाबत खुलासा मागविण्यात आला आहे व त्यांना त्यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश संघटनेकडून हे पत्र जारी करण्यात आले आहे. अनेक वेळा भारतीय जनता पार्टीचे आणि समर्थकांचे  ट्रोल आर्मी, समाज माध्यमांवर पवार कुटुंबातील व्यक्तीच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीवरील शब्दांचा प्रयोग करून पोस्ट निर्माण करत असतात. या सर्व गोष्टीचा मुकाबला संयमाने आम्ही करतो. विचारांची लढाई ही विचारांनीच केली पाहिजे ही शिकवण खुद्द पवार साहेबांची आहे. 

राज्यातील सामाजिक वातावरण दूषित करून समाजातील विविध घटकांमध्ये तेढ निर्माण करत हिंसात्मक संघर्ष उभा करण्याचा काही पक्षांचा आणि संघटनांचा मनसुबा आहे आणि राजकीय-सामाजिक प्रश्न हिंसेच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात अशी त्यांची विचारधारा व हाच त्यांचा इतिहास आहे.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून समाजाला उपयुक्त असलेले राजकीय व सामाजिक बदल घडवण्यार विश्वास ठेवतो. हिच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची शिकवण आहे.


राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारीने सुद्धा याच विचारांनुसार समाजात काम करणे अपेक्षित असून कोणत्याच प्रकारच्या हिंसेचे समर्थन करणे अपेक्षित नाही. 


शेवटी सर्वांनीच हिंसेचा मार्ग पत्करल्यास आपल्या थोर समाजसेवकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी, राजकीय पुढाऱ्यांनी, अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या असंख्य महान व्यक्तींनी आजपर्यंत उभा केलेला हा देश रसातळाला जायला वेळ लागणार नाही, याचा अनुभव आपण आपल्या शेजारील राष्ट्रांकडे आणि जगातील काही राष्ट्रांकडे बघून घेत आहोत. अशा प्रकारचे पत्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी काढले आहे त्यामुळे सुहास कदम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे

Post a Comment

0 Comments