वाशी! इंदापूर येथे खसखस लागवड करणाऱ्यास अटक



वाशी तालुक्यातील इंदापूर येथे शेतकऱ्यांनी खसखस पिकाची बेकायदेशीर लागवड केली होती. त्याची पोलीस विभागाला गोपनीय माहिती मिळाल्यामुळे इंदापूर येथील शेतकरी विश्वंभर प्रल्हाद पारडे यांच्या शेतात छापा टाकून लागवड केलेली खसखस या पिकाची रोपे पोलिसांनी जप्त केली होती. विश्वंभर प्रल्हाद पारडे यांच्या वर १५, १८ एन डी पी एस चा गुन्हा दाखल झाला होता व हे शेतकरी फरार होते. 

फरार आरोपीची गोपनीय माहिती काढून दि १९ मे रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी अंबाडे व वाशी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर काळे, पो. का. सय्यद, पो को पी एस राठोड यांनी विश्वंभर पारडे यांना इंदापूर येथून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डंबाळे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments