पंढरपूर! अवैधरित्या वाळू काढणारे ३ ट्रॅक्टर, ४५ ब्रॉस वाळू जप्त; सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई



स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची धडकेबाज कारवाई अवैधरित्या वाळू काढणारे ३ ट्रॅक्टर, ४५ ब्रॉस वाळू जप्त, मालकावर देखील गुन्हा दाखल तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयातील अवैधरित्या वाळू उपसा करणारे इसमांवर कारवाई करण्यासाठी आदेशीत केले आहे. त्यावरून पोनि सुहास जगताप, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी अवैध वाळू उपसा व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथके नेमण्यात आलेली आहेत.

दि.०१.०५.२०२२ रोजी पंढरपूर तालुक्यातील मौजे देगाव गावचे शिवारातून भिमा नदीचे पात्र वाहत असल्याने सदर ठिकाणी काही इसम नदीपात्रातून वाळू उपसा करून ती विक्रीसाठी पाठवत असल्याबाबतची माहिती  मिळाली होती. त्यावरून पोनि सुहास जगताप यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्यासाठी श्री. शैलेश खेडकर, पोलीस उपनिरीक्षक, स्था. गु.शा., सोलापूर ग्रामीण व त्यांच्या पथकास कारवाई करण्यासाठी पाठवले होते. पोलीस उपनिरीक्षक खेडकर व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी सदर ठिकाणी होणारा वाळू उपसा हा मुख्यतः रात्रीच्या वेळी होत असल्याने दि.०२.०५.२०२२ रोजीच्या पहाटे देगाव गावचे हद्दीमध्ये नदीपात्रातून ज्या ठिकाणी वाळू उपसा होतो अशा ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी नदीपात्रात स्वराज कंपनीचे ३ ट्रॅक्टर व ४५ ब्रॉस वाळूसह काही इसम दिसून आले. त्यातील २ दोन इसमांना जागीच पकडण्यात आलेले असून त्यांचेकडे चौकशी करून वाळू उपसा पॉईन्टचे मालक यांचे सांगणेवरून ते उपसा करीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने सदर पॉईन्ट मालकांना देखील गुन्हयामध्ये आरोपी करण्यात आलेले आहे. 

1) खंडू नागनाथ पाटूले(अटक) ,
2) महेश हरी चव्हाण (अटक),
3) रोहित कैलास वायदंडे (फरार),
4) गमल्या मारुती पवार (फरार),
5) अप्पा किसन चव्हाण (फरार),
6) सिद्धा चव्हाण (फरार)
7) सोमा जाधव(मालक)
8) अक्षय घाडगे(मालक)

रा. सर्व देगाव, ता. पंढरपूर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून सदर गुन्हामध्ये ३ ट्रॅक्टर, ४५ ब्रॉस वाळू असा एकूण १७,२५,०००/- रूपयांचा माल जप्त करण्यात आलेला असून सदरबाबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथेभा.द.वि.क. ३७९, ३४, गौण खनिज अधिनियम कलम ४(१), ४(क)(१) व २१प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या २ आरोपींना पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे पुढील तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही मा. श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा. श्री. हिंमत
जाधव, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, श्री. सुहास जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,
सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शैलेश खेडकर, पोलीस उपनिरीक्षक, श्री. शिवाजी घोळवे, श्री. बीराजी पारेकर, सहा. पो. उपनिरीक्षक, श्री. आबासाहेब मुंढे, पोह / ९०२, श्री. अक्षय दळवी, पोकॉ / १००२ सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी पार पाडली आहे.

Post a Comment

0 Comments