वैराग! वाढदिवसाच्या निमित्ताने आजोबांच्या स्मृतींना अनोखा उजाळा


वैराग : वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याची प्रथाच जणू रुढ झाली आहे. असंख्य केक, डीजे, पार्टी करुन वाढदिवस साजरा केला जातो. परंतु या प्रथेला फाटा देत कुस्ती सम्राट पै.आस्लम काझी व पै.जुनेद शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्यात आला. कै.शफेरुद्दीन काझी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुरुकुल ॲकॅडमी, सुर्डी ता.बार्शी जि.सोलापूर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 

काही महिन्यांनपुर्वी पै.आस्लम काझी यांचे पिताश्री व पै.जुनेद शेख यांचे आजोबा कै.शफेरुद्दीन काझींचे निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा या उद्देशाने पै.जुनेद यांनी आपला व पै.आस्लम काझी यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचे ठरवले. योजलेल्या उपक्रमास मुर्त रुप देताना त्यांनी सुर्डी येथील हणुमंत डोईफोडे संचलित करत असलेल्या गुरुकुल ॲकॅडमी मधील शंभर विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

शिक्षण आणि ज्ञानाच्या उपासनेतून आपल्या  माणसाच्या स्मृती कायम ठेवता येतात. हे या सामाजिक उपक्रमातून पुढे आले. वाढदिवस साजरा करण्याचा नवा  उपक्रमशील प्रयोग या निमित्ताने झाला. या उपक्रमावेळी महिबूब शेख, युसूफ सय्यद, मदन डोईफोडे, मतीन शेख व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments