बार्शी तालुक्यातील जवळगाव येथे एकाला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल



बार्शी तालुक्यातील जवळगाव येथे सामायिक विहिरीतील शेतीच्या वादावरून वडिलाला शिवीगाळ का केली असे विचारले असता भावकीतील दोघांनी ३३ वर्षीय तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैराग पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी संतोष रंगनाथ कापसे वय ३३ राहणार जवळगाव नंबर 2 तालुका बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील रंगनाथ सामायिक विहिरीतील पाण्याच्या कारणावरून यांना शिवीगाळ का केली असा जाब विचारला असता फिर्यादीच्या घरात घुसून लाकडी काठीने हाताने दंडावर मारहाण करून जखमी केले व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून उजव्या दंडाचा चावा घेतला आहे शिवीगाळ व दमदाटी ही केली आहे, त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैभव अरुण कापसे अरूण निवृत्ती कापसे या दोघा जणांविरुद्ध वैराग पोलिसात भादवि कलम 323 324 325 34 452 504 506 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी फिर्याद तीन मे रोजी वैराग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments