बार्शी! जामगावजवळ बेकायदेशीररित्या देशी दारू विकणाऱ्या एकावर गुन्हा दाखल


बार्शी लातूर बायपास रोडवर जामगाव जवळ बेकायदेशीर द्यावी देशी दारूची विक्री होत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एका विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे या घटनेची फिर्याद पोलीस नाईक संदेश कृष्णराज पवार यांनी दिली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना आम्ही जामगाव चौक येथे आलो असता गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, बार्शी लातुर रोडवरिल हटेल बायपास येथील समोर मोकळ्या जागेत एक इसम चोरून देशी विदेशी दारूची विक्री करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळालेने लागलीच रस्त्याने जाणारे येणारे दोन इसमांना पंच म्हणून बोलावून घेवून त्यांना बातमी प्रमाणे हकीगत सांगून ते पंच म्हणून येण्यास तयार झाले नंतर आम्ही पोलीस स्टाफ व पंच असे सदर बातमीच्या ठिकाणी गेलो असता तेथे एक पुरुष छापडी बक्समध्ये मध्ये काहीतरी घेवून बसलेला दिसला. त्याचा आम्हास प्रोव्हीशन गुन्हयांचे कामी संशय आल्याने त्यास आम्ही गराडा घालून जागीच पकडले व त्यास आमची ओळख सांगून त्याचे नाव, गाव विचारता त्याने त्याचे नाव अमोल सर्जेराव आवटे वय45वर्षे, रा. जामगाव आ, ता. बार्शी, जि. सोलापूर असे सांगितले. ती वेळ रात्री 00.01वा. चे सुमारची होती. त्याचे ताब्यातील छापडी बक्स पंचा समक्ष तपासून पाहिले असता त्यात 
विदेशी कंपनीची २५९० रुपयाची दारू जप्त करून ताब्यात घेतली आहे. अमोल सर्जेराव आवटे वय ४५ वर्षे, रा. जामगाव आ, ता. बार्शी, जि. सोलापूर याने आपले कब्जात बेकायदेशीर विनापरवाना वरील वर्णनाचा व किंमतीचा प्रोव्हीशन माल विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगलेल्या स्थितीत मिळून आला आहे. म्हणून त्याच्यावर दारूबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments