सोलापूर/प्रतिनिधी:
सोलापूर शहरांमध्ये केवळ ५०० रुपयांची लाचलुचपत पथकाने पोलीस नाईकला रंगेहाथ पकडले आहे. पोलीस नाईक नाना बेशा शिंदे नेमणूक सदर बझार पोलीस ठाणे, राहणार अरविंद धाम पोलीस लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर असे लाच घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध सीआरपीसी १०७ प्रमाणे करण्यात आलेल्या कारवाई मध्ये तक्रारदार यांना सदर बझार पोलीस ठाणे सोलापुर शहर येथे दि. ०२.०५.२०२२ दि.१०.०५.२०२२ या कालावधीमध्ये दैनदिन हजेरी लावण्यात आली होती. त्यानुसार सदर बझार पोलीस ठाणे येथे हजर राहून हजेरी लावली असल्यावयाचे प्रमाणपत्र देण्याकरीता आलोसे यांनी तक्रारदार यांना ५००/- रुपये लाचेची मागणी करून लाभ एक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून पुढील कार्यवाही करीत आहोत.
0 Comments