बार्शी/ प्रतिनिधी:
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी राज्यातील तब्बल ८०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्हाने गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील १० अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे.
त्यामध्ये जालिंदर सुदाम नालकुल उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी, अरुण ज्ञानदेव फुगे, पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे, धनंजय चित्तरंजन पोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अब्दुल हमीद याकुब शेख पोलीस उपनिरीक्षक नेमणूक ,नागेश तुकाराम गायकवाड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नीलकंठ भालचंद्र जाधवर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नेमणूक- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, संजय विठोबा कवचाळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मोहन शामकर्ण मनसावले पोलीस हवलदार, नेमणूक- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सलीम हुसेन बागवान पोलीस हवलदार नेमणूक- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, संतोष विश्वनाथ म्हेत्रे पोलीस हवलदार या सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अभिनंदन केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १ मे महाराष्ट्र दिनी या सर्व पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहेत.
0 Comments