वडगांव सोसायटी (दक्षिण सोलापूर) निवडणुकीवरून ५ जणांनी एकाला बेदम मारहाण करून गळ्यातील सोन्याची चेन पळविली. नागनाथ गुरूबाळ बिराजदार, जितेंद्र शरणप्पा बिराजदार, श्रीशैल गुरूबाळ बिराजदार, इरण्णा रमेश रासुरे, नागनाथ महादेव दिंडुरे (वडगांव) या सर्व आरोपींनी गावातील सोसायटीत विरोधात का उभारला असे म्हणून अण्णाराव प्रभाकर पाटील (वय ३१) यांना शिवीगाळ करीत मारहाण केली.
लाथाबुक्यांनी मारहाण करीत गळ्यातील सोन्याची दीड तोळ्याची चैनसह ७५ हजारांचा ऐवज नेला. अशी फिर्याद अण्णाराव पाटील यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करीत आहेत.
0 Comments