शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज किरीट सोमय्यांसोबतच तपास यंत्रणांवर देखील आरोप केले आहेत. काही जण ईडी, सीबीआयचा वापर करून लोकांना धमक्या देतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळून हे बँक ऑफ थायलंडमध्ये जमा करतात. हे प्रकरण लवकरच उघडकीस आणणार आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
राऊत म्हणाले की, किरीट सोमय्यांनी पैसे गोळा करून त्याचं काय केलं? हा पोलिस तपासाचा भाग आहे. भाजप ज्याप्रकारचे आरोप करतेय आम्ही त्याप्रकारचे आरोप करत नाही. तुम्ही इतरांकडून पैसे गोळा केले. राजकीय सुडाच्या भावनेनं आम्ही आरोप करत नाही. मनात भीती नसेल तर पोलिसांसमोर हजर व्हायला पाहिजे. तुम्ही पळताय, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करताय. कायद्यापासून पळू नका असं स्वतः म्हणता आणि तुम्हीच पळ काढताय. तुमची अनेक प्रकरणे समोर येणार आहेत, असा इशारा राऊतांनी किरीट सोमय्यांना दिला.
0 Comments