ब्रेकिंग । मिरवणुकीमधून तडीपार इसमास ताब्यात घेताना शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल


सोलापूर - मिरवणुकीमधून तडीपार इसमास ताब्यात घेताना पोलीस कॉन्स्टेबल सोबत झटापटी केल्याप्रकरणी  सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे वय ३८ (रा.आवसे वस्ती आमराई) यास पोलीस उप-आयुक्त सो परिमंडळ सोलापूर यांचेकडील जाक्र २४७०/२०२२ दि १६/१२/२०२२ रोजीचे आदेशान्वये सोलापूर शहर व जिल्हातून ०२ वर्षाकरीता तडीपार केलेले असताना नार्थकोट प्रशाला या ठिकाणी तडीपार इसम  मिळून आला असता त्यास कारवाईकरीता पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना बॉबीला कारवाईला घेऊन जावू नका असे हुज्जत घालून फिर्यादीस व फिर्यादीबरोबर असलेले पो.को पाटील यांना सर्वानी झटापटी करून फिर्यादीच्या शर्टाची गच्ची धरून ओढा ओढी करून फिर्यादीच्या डाव्या पोटरी चावा घेऊन शिवीगाळ करून आम्हाला सोड नाहीतर बघ असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून फिर्यादीच्या शासकीय कामात अडथळा आणुन फिर्यादी व फिर्यादीबरोबरचे कर्मचारी या दोघांवर हल्ला केलेला आहे म्हणून पो.ना रविराज शाम काळे, नेम- फौजदार चावडी पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १) सचिन ऊर्फ बॉबी संभाजी शिंदे, वय-३८ वर्ष, २) सो किती सचिन शिंदे, दोघे रा आवसेवस्ती आमराई.३) सुलोचना दत्तात्रय शिंदे.४) दिक्षा अक्षय वाघमारे, ५) गुड्डी दत्तात्रय शिंदे व इतर दोन अनोळखी पुरूष भारतीय दंड साहित्य १८६० चे कलम १४३,१४७,१४९,३३२,३५३,५०४,५०६,व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२ प्रमाणे फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपस सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहे.

Post a Comment

0 Comments