प्रिती देवराव हुंडाबळी प्रकरण! सासूचा अटकपूर्व जामीन बार्शी सत्र न्यायालयाने फेटाळला



बार्शी/प्रतिनिधी:

प्रीती स्वप्निल देवराम हुंडाबळी प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी सासू रंजना संभाजी देवराम हिचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला.

 लग्नात मानपान झाला नाही म्हणून आणि बांधकाम व्यवसायासाठी माहेर हून पाच लाख रुपये आणण्यासाठी तिला छळत होत्या. त्यामुळे त्यांच्या त्रासास कंटाळून तिने आत्महत्या केली असावी किंवा तिचा घातपात केला असावा, अशी फिर्याद तिचा भाऊ अमृत ऊर्फ अमित गोकूळ नन्नवरे रा. मूळ गाव अरणगाव ता. जामखेड जि. अहमदनगर हल्ली घर नं. ४५ अरण्येश्वर निवास ताम्हाणे वस्ती चिखली, पुणे यांनी दिल्यावरून १) नवरा स्वप्निल संभाजी देवराम, २) सासू सौ. रंजना संभाजी देवराम दोघे मूळ रा. सिरसाव ता. परांडा जि. उस्मानाबाद सध्या रा. साठे वस्ती लोहगाव, पुण 3)नणंद ज्योती महेश गोरे नंदावा ४) महेश भिमराव गोरे दोघे रा. अलीपुर रोड, बार्शी ५) नणंद पुजा सचिन वाघ रा. तुकाई टेकडी काळेपडळ, हडपसर, पुणे यांच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 या प्रकरणी तपासाधिकारी स.पो.नि स्वप्निल इज्जपवार यांनी आतापर्यंत नवरा स्वप्निल देवराम व नंदावा महेश गोरे यांना अटक केलेली आहे. इतर आरोपींपैकी नणंद पुजा हिला ती गरोदर असल्याकारणाने अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. फरार असलेली सासू रंजना देवराम हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तपास चालू आहे. कोठडीतील चौकशीची गरज आहे. या गुन्ह्यातील आरोपीची भूमिका पाहता तिला अटकपूर्व जामीन मंजूर करता येणार नाही. असे नमूद करुन अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजितकुमार भरमे यांनी
रंजना देवराम हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

Post a Comment

0 Comments