राणा दाम्पत्याला खार पोलीसांनी केली अटक



आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा या दोघांना खार पोलिसांनी अटक केली आहे. शिवसेनेच्या तक्रारीनंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्यांना ताब्यात घेतले आहे.

यामुळे आता राणा दाम्पत्यांची आजची (२३ एप्रिल) रात्र पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे. या पार्श्वभूमीवर खार पोलीस स्टेशनमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राणा दाम्पत्यांना १५३ अ कलमा अंतर्गत पोलिसांनी अटक केले आहे. या कलमानुसार, राणा दाम्पत्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण केली, धर्म, वंश, समाजाची शांतता भंग करणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करणे, या आधारे त्यांना अटक करण्यात आली आहे.

या कारणामुळे राणा दाम्पत्यांनी घेतली माघार

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे २३ एप्रिल रोजी हनुमान चालिसा पठाण करणार असल्याची घोषणा केली होती. परंतु, आज पत्रकार परिषद घेऊन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आहे. पंतप्रधानांचा दौरा रद्द होऊ नये, आणि राज्यातील जनता आणि पोलिसांना त्रास होऊन नये म्हणून हनुमान चालिसा पठाण करण्याचे आंदोलन आम्ही थांबवित आहोत, अशी मागणी राणा दाम्पत्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

Post a Comment

0 Comments