परांडा! सोनगिरी येथे सख्या भावानेच केला मुलाच्या मदतीने भावाचा खून


परंडा तालुक्यातील सोनगीरी येथे शेतातील सततच्या भांडण व कटकटीला वैतागून सख्खा भावाने मुलाच्या मदतीने भावाला काठीने मारहाण करीत दगडाने ठेचुन हत्या केल्याची घटना रविवार(ता. २४) रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. याप्रकरणी बापलेकाविरोधात परंडा पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीसांनी सांगितले की, सोनगीरी ता.परंडा येथील
महादेव भानुदास खरपुडे, सुधीर महादेव खरपुडे या बापलेकास यातील मयत पोपट खरपुडे हा भावाला शेतात येऊ नकोस म्हणुन सतत वाद घालत होता.याच कारणावरून रविवारी सकाळी १० वाजता पोपट खरपुडे व भाऊमहादेव त्यांचा मुलगा सुधीर यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते.सततच्या भांडणाला कंटाळून अखेरपिता पुत्राने पोपट यास काठी व दगडाने मारहान केल्याने पोपट खरपुडे हा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.घटनेचीमाहिती मिळाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे सहायक पोलिस निरिक्षक हिंगे, पोना विशाल खोसे, पोहेकॉ दिलीप पवार, पोहेकॉबळी शिंदे, पोना
एस.सी.गायकवाड, पोना ए बी वाघमारे, चालक भिंगडे यांच्या
पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.मयत
पोपट खरपुडे यास दोन मुली व एक मुलगा असुन सतत त्रास देत असल्याने त्याची पत्नी व मुलांनी १० वर्षापुर्वी पोपट यास सोडून गेले होते. पत्नीवमुलगा पुण्याला राहत आहेत.पोपट हा त्याचा भाऊ महादेवयासह शेजारीव परिसरातील लोकांना नेहमीच त्रास देत होता भावालाशेतात येऊ देत नव्हतावनेहमी भांडणे करीत असल्याने सततच्या त्रासाला कंटाळून रविवारी
संध्याकाळी ६ वाजता काठीने व दगडाने मारहाण करून ठार
केले. याप्रकरणी नवनाथ वेताळ यांच्या फिर्यादीवरून महादेव
खरपुडे, सुधीर खरपुडे या पिता पुत्रा विरूद्ध खुनाचा गुन्हा
दाखल करून अटक करण्यात आली आहे. उपविभागीय
पोलिस आधिकारी दिनकर डंबाळे यांच्यामार्गदर्शनाखाली
पुढील तपास तपास पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments