बार्शी/ प्रतिनिधी:

बार्शी लातूर बायपास रोड जवळ गाताचीवाडी रोडला जवळ मदत मागण्याच्या बहाण्याने अडीच तोळे सोन्याच्या तिनं अंगठया व रोख रक्कम असा एक लाख चार हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना १३ एप्रिल रोजी संध्याकाळी रात्री सव्वा दहा च्या दरम्यान घडली आहे, याबाबत महेश नागनाथ माने (वय ३०) रा. ८० बसवराज नगर जुळे सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात तिघांविरुद्ध तालुका पोलीस स्टेशन बार्शी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंबंधी अधिक वृत्त असे, रात्रीच्या वेळी मदत मागण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या जवळ जाउन चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम व सोन्याच्या अंगठ्या असा एक लाख पाच हजाराचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून मोटरसायकलवर तिघेजण निघून गेले आहेत. अज्ञात तिघांवर भादवि कलम 34 व 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत. अशी माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे प्रेस नोटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.