बार्शी रोड येथे कारणावरून तरुणावर चाकू हल्ला


सोलापूर : किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूहल्ला केल्याची घटना १६ एप्रिल रोजी एमएसईबी ऑफिस बार्शी रोड सोलापूर येथे घडली. याप्रकरणी सोहेल महमंद उस्मान पठाण (वय-२३,रा. अंबिका नगर,एमएसईबी ऑफिसच्या समोर,बार्शी रोड, बाळे,सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून मल्लिकार्जुन सुरेश हुल्लुर,सुरेश हुल्लुर (रा. अंबिका नंबर, एमएसईबी ऑफिस समोर,बार्शी रोड,बाळे,सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हा कामाला जाण्यासाठी पायी जात होता. त्यावेळी मल्लिकार्जुन याने फिर्यादी समोर येऊन फिर्यादीच्या कानाखाली चापट मारली. फिर्यादीने विचारणा केली असताना संशयित आरोपी मल्लिकार्जुन याने त्याच्या खिशातील चाकू काढून फिर्यादीवर वार केला. फिर्यादी सोहेल याने तो वर त्याच्या उजव्या हातावर घेतला व दुसरा वार करत असतांना संशयित आरोपी सुरेश हा घेऊन फिर्यादीला बाजूला ओढून घेऊन जोराने चापट मारून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलिस नाईक परीट हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments