बार्शी! राळेरास सोसायटीवर आमदार राजाभाऊ राऊत यांचे वर्चस्व



राळेरास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार राजाभाऊ राऊत गटाच्या ११ उमेदवारांनी विजय मिळवित निर्विवाद वर्चस्व मिळविले.

माजी आमदार कै. चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्या आशीर्वादाने व आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून पांडुरंग निचळ, बापू भोसले, दत्तु पंके, भारत पंके, कृष्णात भोसले, लक्ष्मण भोसले, धर्मराज पंके, महिला सर्वसाधारण गटातून सौ.प्रमिलाताई निचळ, सौ. सुलभाताई पंके, अनुसूचित जाती जमाती गटातून बापू खाडे, मागास प्रवर्ग गटातून शत्रुघ्न गुडे हे अकरा उमेदवार निवडून आले.

या विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांचा आमदार राजाभाऊ राऊत यांनी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अनिल काका डिसले, माजी जि.प.सदस्य संतोष दादा निंबाळकर, सरपंच मनोज पंके, बाबासाहेब मोरे, सचिन मडके उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments