परांडा :
दि . 14 जानेवारी 2022 येथील कमांडो करिअर ॲकॅडमी च्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . कमांडो अकॅडमी बावची रोड परांडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या अकॅडमी मध्ये सर्व बहुजन समाजाचे विद्यार्थी प्रशिक्षण घेत असल्याने आणि या अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष मेजर महावीर तनपुरे यांचे या देशाविषयी चे प्रेम पाहता ज्या महामानवाने देशाची घटना लिहिली आणि या देशाच्या घटनेवर हा देश चालतो अशा महामानवाच्या विचारांना आत्मसात करून त्यांचे शैक्षणिक विचार आत्मसात करून देशातील नव तरुणांना विविध भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचविणे हे महान कार्य ते करत आहेत . बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कमांडो करिअर अकॅडमी अगदी प्रामाणिकपणे विविध जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन या देशाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करत आहे .या जयंती निमित्त अकॅडमी मधील सर्व विद्यार्थ्यांसह मेजर महावीर तनपुरे, भाग्यश्री तनपुरे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
0 Comments