कंटेनरच्या दरवाजाला इलेक्ट्रिक तारेचा स्पर्श होऊन बसलेल्या इलेक्ट्रीक शॉकमुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना मोहोळ येथील चंद्रमोळी औद्योगिक वसाहतीमध्ये ग्लेनमार्क कंपनीसमोर घडली.
याबाबत मोहोळ पोलिसाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील कंटेनर (क्रमांक एमएच-20-ईजी-4469) हा मोहोळ येथील चंद्रमौळी औद्योगिक वसाहती मधील ग्लेन मार्क कंपनीमध्ये प्लास्टिकचे स्क्रॅप भरण्यासाठी आला होता. सदर वाहनांमध्ये स्क्रॅप मटेरियल भरून गाडी कंपनी बाहेर लावून थांबले आसता कंटेनरचा दरवाजा बंद करीत असताना शेजारून गेलेल्या उच्चदाब विज वाहिनीच्या तारांना कंटेनरच्या दरवाजाचा स्पर्श झाला त्यात पप्पुकुमार गौतम रमनिवर (वय 27, रा. जिगनामापी ता. इटवा जिल्हा सिध्दार्थ नगर) याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत गुलाम नबी खान (वय 34, रा. भरकलगेट, इकरा अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक 9 औरंगाबाद) याने याबाबत मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून पुढील या घटनेचा तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.
0 Comments