उस्मानाबादमध्ये ईडीने जप्त केली मंत्री नबाब मलिक यांनी १५० एकर



उस्मानाबाद/प्रतिनिधी:

मंत्री नवाब मलिक यांना ईडीने दणका दिला आहे, मलिक कुटुंबाच्या नावाने उस्मानाबाद जिल्ह्यातील दुमले जवळा येथे असलेली १५० एकर जमीन ईडीने केली केली आहे. जमीन खरेदी करताना मूल्यांकन कमी दाखवून जमीन खरेदी केली शिवाय मलिक हे शेतकरी नसताना त्यांनी बोगस कागदपत्रे तयार करून ही जमीन खरेदी केली.

मेहजबीन नवाब मलिक, सना नवाब मलिक, अमीर नवाब मलिक, निलोफर समीर खान , फराज नवाब मलिक व बुश्रा फराज या नावाने जमीन खरेदी केली आहे. जमीन् बागायती असताना कोरडवाहू जमीन दाखवून मूल्यांकन १ कोटी २० लाखाने कमी केले आहे. कागदोपत्री २ कोटी ७ लाखला जमीन खरेदी केल्याचे नमूद केले मात्र प्रत्यक्षात जास्त रक्कम दिली गेल्याचा आरोप आहे. १५० एकर जमीन् खरेदी करताना आला पैसा कुठून? हा पैसा बेनामी असल्याचा आरोप असून ही संपत्ती जप्त केली आहे. ईडीने या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करित जप्तीची कारवाई केली. भाजप जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांनी हे प्रकरण उचलून धरत बेनामी संपत्ती बाबत गंभीर आरोप केले होते.

ईडीने जप्त केलेल्या १५० एकर जमिनीत एक मोठा २ मजली बंगला आहे शिवाय जनावरांचा गोठा आहे. जमीन खरेदी वेळी मूल्यांकन कमी दाखविण्यासाठी हा बंगला कागदावर दाखविण्यात आला नव्हता.

Post a Comment

0 Comments