वैराग/प्रतिनिधी:
मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे व राज्यमंत्री अदितीताई तटकरे यांची बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते निरंजन भुमकर यांनी भेट घेऊन वैराग येथील संतनाथ महाराज मंदिरा साठी तिर्थक्षेत्र ब वर्ग साठी पर्यटन विकास मंडळाकडुन निधी मिळणेबाबत. वैराग शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करनेबाबत.
वैराग नगरपंचायतीस मोबाईल टॉयलेटच्या दहा गाड्या बनविण्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर करणेबाबत.वैराग नगरपंचायतीस ओला व सुका कचरा गोळा करण्याकरीता घंटागाड्या व रोडवरील कचरा गोळाकरणार्या संक्क्षण मशीनीसाठी १.५ कोटीचा निधी मिळणेबाबत आशा मागण्या केल्या आसता यावर मंत्री महोदयांनी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी आश्या सुचना संबंधीत आधिकार्यास दिल्या. यावेळी वैराग नगरपंचायत पाणी पुरवठा सभापती अतुल मोहिते, उदय जाधव, आस्लम शेख व बाळासाहेब जाधव उपस्थित होते.
0 Comments