बार्शी! रेड लाईट एरियातील महिलांनां शिधापत्रिका तर तृतीयपंथींयांची मतदार नोंदणी



बार्शी - आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनाचे औचित्य साधून शहरातील तृतीयपंथीयांचे मतदार नोंदणी शिबीर तहसील कार्यालयात घेण्यात आले. याचबरोबर रेड लाईट एरियातील अर्थात देहविक्रय करणाऱ्या महिलांना शिधापत्रिकांचे वाटपही करण्यात आले.

जागतिक पातळीवर ३१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीयपंथ ओळख दिन म्हणून आता साजरा करण्यात येणार आहे. याचाच भाग म्हणून राज्याच्या मुख्य निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार बार्शी तहसील कार्यालयाने शहरातील तृतीयपंथीयांचे मतदार नोंदणी शिबीर घेतले. तसेच देहविक्रय करणाऱ्या महिलांना शिधापत्रिकांचेही वाटप केले.

वंचित घटकाबाबत शासन, प्रशासनस्तरावर सुरु असलेल्या योजनांचा लाभ देहविक्रय करणाèया महिला व तृतीयपंथी यांना यापुढेही मिळत रहावा. शरीर विकणाऱ्या महिला तसेच मुलगा म्हणून जन्म घेऊनही तृतीयपंथींचे आयुष्य वाट्याला आलेल्यांचा सन्मान करून त्यांच्या वेदना कमी करण्याच प्रयत्नही अनेक संस्था, शासन यांच्याकडून सुरु असल्याने ही दिलासा देणारी बाब आहे, असे लेखक तथा स्मार्ट अ‍ॅकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे म्हणाले. निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंढे,  यांनीही भूमिका मांडत या वंचित घटकासाठी आम्ही सातत्याने मदतीसाठी तत्पर राहू, असा शब्द दिला.

कार्यक्रमासाठी महसूल नायब तहसीलदार ए.डब्ल्यू काझी, गोदाम व्यवस्थापक ऋषिकेत धनवडे तसेच आण्णा लांडगे, उदय कोंढारे, स्मिता कोल्हे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments