वाळू वाहतूक दाराकडे मागितली दोन लाखांची खंडणी , प्रहार संघटनेच्या संजिवनी बारंगुळेंवर गुन्हा दाखल



वाळूची ट्रक अडवून पैसे मागितल्याप्रकरणी प्रहार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा संजीवनी बारंगुळे यांच्यासह तीन जणांविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुरज श्रीपती शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकमालकाकडे तब्बल 2 लाख रुपये खंडणी मागणे व तसे न केल्यास अॅट्रॉसिटी व बलात्काराचे गुन्हे दाखल करू, अशी दमदाटी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवेढा येथून वाळू भरुन निघालेली ट्रक वैरागमार्गे बीड येथे जात असताना, मानेगाव येथे ही ट्रक अडविण्यात आली. तसेच, आरोपींकडून पैशाची मागणी करत दमदाटी करण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. याप्रकरणी, वैराग पोलीस ठाणे भादंवि कलम 384, 385, 388, 341, 34 नुसार संजीवनी बारंगुळे रा. नागोबाचीवाडी, सोनाली गायकवाड, म्हाडा कॉलनी बार्शी, दिक्षा शिंदे यांच्यासह आणखी एका जणावर गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व आरोपींनी संगनमत करून वाळुची ट्रक अडवून २ लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी, जवळ असलेले १०,००० रुपये फिर्यादीने भीतीपोटी दिले. मात्र, २ लाख देणे शक्य नसल्याने फिर्यादीला अॅट्रऑसिटी व बलात्काराचे गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments