रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप सोडणार?


IPL 2022 आधी विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची कॅप्टनशिप सोडली. एमएस धोनीने सुद्धा या सीजनआधी कॅप्टनशिप सोडून रवींद्र जाडेजाकडे धुरा सोपवली. विराट, धोनी प्रमाणे रोहित शर्मा सुद्धा आता मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप सोडणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्यामते रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप सोडू शकतो.

विराट कोहली प्रमाणे रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडू शकतो, असं विधान संजय मांजरेकर यांनी केलं आहे. मांजरेकर एवढ्यावर थांबले नाहीत, त्यांनी मुंबई इंडियन्स संघासाठी नव्या कॅप्टनचाही पर्याय सुचवला आहे. रोहित शर्माने कॅप्टनशिप सोडली, तर त्याजागी कायरन पोलार्डकडे मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सोपवावं, असं संजय मांजरेकर यांनी म्हटलं आहे. 

“कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्सच्या संघात महत्त्वपूर्ण योगदान देत आलाय. विराट कोहलीप्रमाणे रोहित शर्मा सुद्धा मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप सोडू शकतो, असं मला वाटतं. यामुळे रोहित शर्मावरील दबाव कमी होईल व फलंदाज म्हणून तो जास्त योगदान देऊ शकतो. पोलार्ड एक चांगला कॅप्टन आहे. त्यामुळे त्याच्यावर जबाबदारी सोपवली पाहिजे” असं संजय मांजरेकर मुलाखतीत म्हणाले.

Post a Comment

0 Comments