मंत्री अमित देशमुख यांची भर पावसात सभा; 'त्या' ऐतिहासिक सभेची आठवण


कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच वैद्यकिय मंत्री अमित देशमुख आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी भर पावसात सभा घेतली. विशेष म्हणजे उपस्थित नागरिकांनी सुद्धा यावेळी पावसात थांबून मंत्र्यांचे भाषण ऐकले. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ येथील टाकाळा चौकात सभा सुरू होती. यामध्ये अचानक पावसाने हजेरी लावली. मात्र सातारा येथे झालेल्या शरद पवारांच्या 'त्या' ऐतिहासिक सभेची आठवण झाली.

तर कोल्हापूर उत्तर विधानसभेतील पहिल्या आमदार होतील - जयश्री जाधव यांचा विजय म्हणजे सर्वसामन्यांचा विजय आहे. जिवाचं रान करा, भाजपच्या भूल थाप्पाना बळी पडू नका. कोल्हापुरात चांगल्या प्रकारे वैद्यकिय शिक्षण देण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. शिवाय पुरातत्व आरखड्यासाठी व चित्रनगरीसाठी निधी कमी पडू दिला नाही. सतेज पाटील यांचे सारखे पालकमंत्री असल्याने कोल्हापूर शहरवासीय नशीबवान आहेत. कोल्हापूरची संस्कृती येथील एतहासिक परंपरा वेगळी आहे. तुमचे मत हे महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी असेल असे म्हणत जयश्री जाधव कोल्हापूर उत्तर विधानसभेतील पहिल्या आमदार होतील असा विश्वास सुद्धा मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments