मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या चार वाहनांचा ओरटेक करण्याच्या नादात एकमेकावर आदळून अपघात झाला. या अपघातात अभिनेत्री मलायका अरोरा जखमी झाल्याचे माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात जखमी झालेल्या मलायका अरोराला अपोलो हॉस्पिटलमध्ये मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुणे कडून मुंबईच्या दिशेने मनसे सैनिकांची मेळावासाठी निघालेली बस भरधाव वेगात निघाली होती. तेव्हाच अभिनेत्री मलायका सुद्धा आपल्या आलिशान रेज रोअर कार मधून मुंबईकडे निघाली होती. यांच्या सह अन्य दोन कार अशी चार वाहने एका पाठोपाठ एक मुबंईकडे भरधाव वेगाने निघाली होती. बोरघाटात ही वाहने आल्यावर एकमेकांना ओवरटेक करण्याच्या नादात या चारही वाहनांचा एकमेकांवर आदळून अपघात झाला. या अपघातामुळे घाटामध्ये काहीकाळ वाहतुक कोंडी देखिल झाली होती.
या अपघातात एक महिला जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र काही वेळाने सदर महिला ही प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा असल्याचे समोर आले. मनसेचे कार्यकर्ते जयराज लांडगे व त्यांच्या सहकार्यांनी मलायकाला उपचारासाठी मुंबई येथील अपोलो रुग्णालयात दाखल केले. यावेळी मलायकाचे सर्व तपासणी व सिटी स्कॅन करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. पण, या अपघातामुळे तिला चार टाके पडले असल्याची माहिती मिळत आहे.
0 Comments