सोलापूर! म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन

सोलापूर:- महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "सम्यक प्रज्ञा शोध परीक्षा - २०२२" या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले असल्याची माहिती बुद्धजय भालशंकर यांनी दिली आहे.
     
ही शिष्यवृत्ती परीक्षा शुक्रवार दिनांक १५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ठीक १०.३० ते ११.३०.या वेळेत जैन गुरुकुल प्रशाला बाळीवेस,सोलापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे.परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून परीक्षेचा विषय -  ,"फुले-शाहू-आंबेडकर यांचे सामाजिक कार्य,भारतीय संविधान- निर्मिती त्यातील महत्वाच्या तरतुदी आणि संस्था " असा आहे.शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण रुपये १५०००/- ची शिष्यवृत्ती,सन्मानचिन्ह आणि ग्रंथ भेट देण्यात येणार आहे. परीक्षेसाठी पात्रता इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. 
   
ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी करायची असून नावनोंदणी आणि अधिक माहिती साठी -बुद्धजय  भालशंकर मो.९९६०३७२७३६, आशुतोष तोंडसे मो.७०३८८८३३३९,प्रा. सुधाकर गायकवाड मो ७३५०२९२९४७, सुशिलचंद्र भालशंकर मो.७०२०८५२५५३, सत्यवान पाचकुडवे मो.८३२९१०३७९८, राहुल साखरे ,पंढरपूर मो. ९०२८२२५४५९,खंडू कोळी,  मंगळवेढा मो.९६६५१६५२५० यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

Post a Comment

0 Comments