सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवठे गावात शेतात जुगार खेळणाऱ्या ९ जणांवर पोलीसांनी छापा टाकून ४ लाख ८५ हजार ७५० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.
शाम रूपसिंग पवार, शिरीष राम गायकवाड, अशोक गोपाळ जाधव, शरणप्पा गुरण्णा तोळनुरे, उमेश धोंडीबा सुरते, राजेश विलास गायकवाड, रमेश आंबादास राठोड, भिमाशंकर मल्लिकार्जुन पाटील, राहुल सोमनाथ चव्हाण असे आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण कवठे गावातील एका पडीक शेत जमीनीतील झाडी झुडपामध्ये गोलाकार बसून ५२ पत्यावर पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाला मिळाली.
त्यावरून तेथे छापा टाकून सर्वजणांना ताब्यात आणि त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य, मोटारसायकल, मोबाईल इलेक्ट्रीक साहित्य असा एकूण ४ लाख ८५ हजार ७५० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या जुगारातील शौकत शेख आणि तुळशीदास गायकवाड हे पळून गेले. ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, हवालदार दिलीप भालशंकर, पोलीस नाईक योगेश बर्डे, वाजिद पटेल, नरेंद्र नक्का, सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील हवालदार पवार, कदम, शेख, गायकवाड, उडाणशिवे, साळुंखे, माळी, लामतुरे आदींनी यशस्वीपणे पार पाडली.
0 Comments