‘बाळासाठी प्रयत्न चाललेले अन् तिकडे नवऱ्याने माझ्या बहिणीला गर्भवती केलं’


 कोणतेही नाते हे विश्वासावर टिकून असतं. नात्यात एकमेकांवर विश्वास ठेवणे आणि तो विश्वास जोपासणे गरजेचं आहे. आपल्या जोडीदाराने जर आपला विश्वासघात केला, ही भावना खूप क्लेशदायक असते. परंतु जेव्हा हा विश्वासघात एखाद्या जवळच्या मित्रासह किंवा अगदी नातेवाईकासह घेऊन केला जातो तेव्हा विश्वासघाताची सीमा पार होते.

अशातच एका महिलेच्या नवऱ्याचे तिच्या सख्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याची बाब उघडकीस आली असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. धक्कादायक म्हणजे अनेक वर्षांपासून ती महिला गरोदर राहण्यासाठी धडपडत होती मात्र तिची बहीणच तिच्या पतीपासून गरोदर राहिली.

महिला सांगते की जेव्हा आमचे लग्न झाले तेव्हा मला गर्भधारणा होण्याकरीता बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. नंतर तिला तिच्या नवऱ्याचे तिच्याच बहिणीशी प्रेम संबंध असल्याचे समजले. हे तिच्यासाठी खूप वेदनादायी होते असे ती म्हणते. त्यांनतर दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला. दोघे वेगळे झाल्यानंतर तिची बहीण तिच्या नवऱ्यापासून गरोदर असल्याचे तीला कळले. त्यानंतर आमचा घटस्फोट झाला, असे ती सांगते.

आई-वडील सुरुवातीला तिच्या बहिणीवर रागावले होते, पण बाळाचा जन्म झाल्यावर त्यांनी तिला स्वीकारल्याचं ती महिला म्हणाली. सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे.

Post a Comment

0 Comments