सोलापूर/प्रतिनीधी:
शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना धोका निर्माण करणाऱ्या व शहराच्या शांततेला भंग करणाऱ्या तिघांना शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने तडीपार करण्यात आले आहे.एकदम तिघांना तडीपार केल्याने सोलापूरकर समाधान व्यक्त करत आहेत.या तिघांना तडीपार करणे म्हणजे एका टोळीला तडीपार करण्यात आले आहे.ही टोळी आपला उद्देश साध्य करण्याच्या हेतूने संघटीतरीत्या टोळी प्रस्थापीत करुन टोळीच्या माध्यमातून साथीदारांसह जबरी चोरी करणे, मोटार सायकल चोरी करणे इत्यादी गंभीर स्वरुपाचे गुन्हे करत होती.
तीन जणांच्या टोळीला दोन वर्षांसाठी तडीपार-
पोलीस उपायुक्त डॉ वैशाली कडुकर यांनी आदित्य शैलेंद्र माने, (वय १९ वर्षे, रा. थोबडे मळा, देगांव नाका, सोलापूर), ओंकार संतोष नलावडे, (वय १९ वर्षे, रा. सुंदराबाई डागा शाळेजवळ, दमाणी नगर, सोलापूर), संतोष दत्ता निजामपुरे(वय-२३ वर्षे, रा. बांधवस्ती, दमाणी नगर, सोलापूर )या टोळीतील इसमांना सोलापूर शहर, उर्वरीत सोलापूर जिल्हा पुणे जिल्हयातील इंदापूर तालूका व उस्मानाबाद जिल्हा येथून दोन वर्षे या कलावधीकरीता तडीपार केले आहे.
0 Comments