सायबर सेलच्या विशेष पथकाची सोशल मीडियावर तिसऱ्या डोळ्याची नजर आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात न घेता शांतता राखावी, असे आवाहन पोलिस आयुक्तालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
पोलिस आयुक्तालयाच्यावतीने सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की, जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज, फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर अथवा पोस्ट करू नयेत. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात न घेता शांतता राखावी. सायबर सेलचे विशेष पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलिस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे. चुकीची माहिती, त्याची पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
0 Comments