उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी ईडी येते मग सुप्रिया सुळेंच्या घरी ईडी का येत नाही? शरद पवार जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतात त्यावेळी नवीन व्यक्तीचे नाव सांगतात आणि त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांची कारवाई होते, असा आरोप गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. या प्रश्नावर उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पतीलाही नोटीस आली असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
सुप्रिया सुळे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलताना त्यांनी विविध प्रश्नांवर भाष्य केले. सुळे यांना राज ठाकरे यांच्या आरोपांविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, राज ठाकरे यांना मिळालेली माहिती चुकीची आणि बिनबुडाची आहे. मी केंद्र सरकारच्या विरोधात भाषण केल्यानंतर माझे पती सदानंद सुळे यांनाही इन्कम टॅक्सची नोटीस आली होती, असा गौप्यस्फोट केला.
0 Comments