अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथील दरोड्यासह हन्नूर, चपळगाव, पानमंगरुळ, तडवळ आणि मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथील घरफोडी उकल करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. त्यात सात गुन्ह्यांची उकल करून १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिली.
शिरवळ येथे राहणाऱ्या शांताबाई दत्तात्रय कोळेकर यांच्या घरात घुसून सहा दरोडेखोरांनी त्यांच्यासह त्यांच्या पतीला मारहाण केली. त्यानंतर ३ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सनीदेवल सुरेश काळे या आरोपीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता आरोपींनी सात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलिस यातील इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
0 Comments